Ad will apear here
Next
म्युझियम कट्ट्यावर ‘भिन्न षड्ज’
किशोरी आमोणकरमुंबई : डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर वस्तुसंग्रहालयातर्फे म्युझियम कट्टा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या कट्ट्यावर चित्रपट, साहित्य, नाटक, लोककला याविषयीची सादरीकरणे, चर्चा घडवून आणल्या जाणार आहेत. या वेळी म्युझियम कट्टा अंतर्गत किशोरी आमोणकर यांच्या सांगीतिक प्रवासावर बेतलेला, अमोल पालेकर आणि संध्या गोखले दिग्दर्शित ‘भिन्न षड्ज’ हा माहितीपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. सोबतच, माहितीपट प्रदर्शनानंतर किशोरीताईंचे शिष्य नंदिनी बेडेकर आणि रघुनंदन पणशीकर आपले किशोरीताईंच्या सहवासातले, त्यांच्याकडून गाणं शिकतानाचे, त्यांना गाण्यात साथ करतानाचे अनुभव कथन करतील.

तीन एप्रिल २०१७ रोजी गानसरस्वती किशोरी आमोणकर अनंतात विलीन झाल्या. म्युझियम कट्ट्यावरची ही बैठक गानसरस्वती किशोरीताईंच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील कारकिर्दीला समर्पित केली जाणार आहे. 

अगदी बालपणीच किशोरीताईंनी गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्या आई, मोगूबाई कुर्डीकर यांनी जयपूर घराण्यातील अल्लादियाँ खाँसाहेबांकडून संगीताचं शिक्षण घेतलं. आईकडून जयपूर घराण्याशी परिचित होत असतानाच आमोणकर यांनी स्वत:ची अशी वेगळी शैली घडवली, ज्यावर अनेक घराण्यांतील शैलींचा प्रभाव होता. 

‘भिन्न षड्ज’ या माहितीपटातून आमोणकरांचा सांगीतिक प्रवास समोर येतो तो उस्ताद झाकीर हुसेन, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उस्ताद अमजद अली खान यांच्या किशोरीबाईंच्या गाण्याबद्दलच्या नोंदीसोबत. त्यांच्या संगीतातील खुबी आणि आर्तता संगीतविश्वातील विविध प्रतिभावंतांकडून चित्रपटात मांडण्यात आली आहे. किशोरीताई स्वत:, रागामागचा त्यांचा विचार विशद करतात, अद्वैताकडे नेणाऱ्या षड्जाविषयी सांगतात.

मोगूबाईंच्या गाण्यांची रेकॉर्डिंग्ज या चित्रपटात ऐकता येतात. झाकिर हुसेन म्हणतात, ‘किशोरीताईंच्या संगीतात ओथंबून वाहणारा आनंद आहे, प्रचंड दुःख, तीव्र द्वेष, निराशा आणि आर्तता आहे. सगळ्यातलं सत्व त्या आपल्या पुढ्यात ठेवतात. ..त्यांचं गाणं ऐकताना एखाद्याच्या व्यक्तिचित्रातल्याप्रमाणं एकन् एक बारकावा टिपत पुढं जावं तसं त्याचं गाणं ऐकताना होतं.’

हा माहितीपट मराठी भाषेमध्ये असून तो इंग्रजी उपशीर्षकांसह पाहण्याची संधी संग्रहालयाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, केवळ संग्रहालयाचे प्रवेशमूल्य आकारण्यात येईल.

कार्यक्रमाविषयी :
दिनांक : १८ जून २०१७ 
वेळ : सकाळी ११.३० ते दुपारी एक
स्थळ : डॉ. भाऊ दाजी लाड मुंबई शहर वस्तुसंग्रहालय, भायखळा, मुंबई.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZKNBD
Similar Posts
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान मुंबई : ‘लेक्सस’तर्फे लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया (एलडीएआय) या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी १२ विविध वर्गवारींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी ७००हून अधिक प्रवेशिका ‘लेक्सस’कडे आल्या होत्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language